धनंजय मुंडेंनी ‘त्या’ कलाकारांवर व्यक्त केली नाराजी!

धनंजय मुंडेंनी ‘त्या’ कलाकारांवर व्यक्त केली नाराजी!

मुंबई – काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. हा हॅशटॅग अनेक सेलिब्रिटींनी ट्वीट केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. जनतेनं शिवसेना-भाजप महायुतीला बहूमत दिलं असलं तरी मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले. 50-50 चा फॉर्म्युला भाजपनं मान्य न केल्यामुळे शिवसेनेनं भाजपला साथ दिली नाही. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करु शकली नाही. त्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्यपालांच्या निमंत्रणानंतर शिवसेनेला काँग्रेसनं पाठिंबा दिला नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यात शिवसेना अपयशी ठरली. या घडामोडीनंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे.

अशातच काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच या कलाकारांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

COMMENTS