लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख रूग्णालयात!

लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख रूग्णालयात!

लातूर – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सर्वच राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराचा शेवटचा आठवडा असल्यामुळे दिवस-रात्र एक करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करत आहेत. परंंतु अशातच लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान धीरज देशमुख यांना व्हायरल इन्फेक्शन झाले असून त्यांच्यावर लातूरमधील सारडा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून ते रूग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धीरज यांचा प्रचार बंद आहे. मतदान जवळ आले असतानाच धीरज देशमुख आजारी पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांना आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी या दोन्ही बंधूंचा जोरदार प्रचार सुरु आहे. परंतु अशातच धीरज देशमुख हे आजारी पडल्याने त्यांचा प्रचार थंडावला आहे.

COMMENTS