अजितदादांच्या स्तुतीनंतर धीरज देशमुख म्हणाले…

अजितदादांच्या स्तुतीनंतर धीरज देशमुख म्हणाले…

नागपूर – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आदित्य नवखा आहे. सगळ्यांमध्ये मिसळतो. काय करता येईल हे सभागृहात पाहतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही. अहंकार दिसत नाही,  हे कौतुकास्पद आहे. तर
काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्याबाबत, धीरज बोलताना तर मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असं वाटलं, बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासरावांसारखीच असल्याचं वाटत होतं असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांच्या या कौतुकानंतर धीरज देशमुख यांनी अजित पवार यांचे आभार मानलेत.अजितदादांचा मी आभारी आहे. दादांनी स्तुती केली.  आज दादांच्या वाणीतून बाबांनी स्तुती केल्याचं वाटलं असल्याचं धीरज देशमुख म्हणाले.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे, महाराष्ट्राच्या कामाला गती मिळेल. विरोधक फक्त विरोधासाठी मुद्दे मांडत होते. महाराष्ट्रात जे प्रश्न भेडसावत आहेत, ते फक्त टीका करण्यासाठीच असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

COMMENTS