धुळ्यात भाजपला स्पष्ट बहूमत, अंतिम निकाल महापॉलिटिक्सच्या हाती, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

धुळ्यात भाजपला स्पष्ट बहूमत, अंतिम निकाल महापॉलिटिक्सच्या हाती, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

धुळे – राज्याचं लक्ष लागलेल्या धुळे महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून भाजपला स्पष्ट बहूमत मिळालं आहे. भाजपनं 50 जागांवर विजय मिळवत महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 9 जागा,काँग्रेसला 4, शिवसेनेला दोन जागा, अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामला एक जागा मिळाली आहे. तसेच इतर 8 उमेदवार निवडून आले आहेत.

दरम्यान धुळे महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत वाद पहावयास मिळाला. त्यामुळे याचा फायदा इतर पक्षांना होईल असं वाटत होतं. परंतु तरीही या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून 50 जागांवर विजय मिळवला आहे.

 

COMMENTS