धुळ्यात महापौरपदासाठी अनेकांची नावे चर्चेत, ‘यांचं’ पारडं जड !

धुळ्यात महापौरपदासाठी अनेकांची नावे चर्चेत, ‘यांचं’ पारडं जड !

धुळे – धुळे महापालिकेत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महापौर पदासाठी याठिकाणी जोरदार चुरस पहायला मिळत असून अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये वाली बेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, शितल नवले, हर्ष रेलन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यात शितल नवले यांचं पारडं सर्वात जड असल्याची माहिती आहे.

धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपने 50 जागांवर आघाडी घेत बहुमताचा जादुई आकडा पार केला. भाजपच्या  विजयामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला.

तर दुसरीकडे बंड पुकारून भाजपविरोधात दंड थोपटणारे अनिल गोटे यांनाही मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

COMMENTS