बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत दुचाकीवर जाणार दिल्लीला

बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत दुचाकीवर जाणार दिल्लीला

मुंबई – कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या एल्गार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट करून चलो दिल्लाचा नारा देत ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यासोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलकांनी आता दिल्लीत येणारे सर्व एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळं दिल्लीमध्ये येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांनी सोनीपत, बहादुरगड, मथुरा आणि गाजियाबादवरुन दिल्लीला जोडणारे पाचही एंट्री प्वाईंट्स बंद करण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत सरकारच्या वतीनं चर्चेचा प्रस्तावही ठेवला. पण तरीही शेतकरी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिल्लीच्या वेशीवर धडकलेलं हे शेतकरी वादळ त्यामुळे आता कुठल्या वळणावर जाणार? हे महत्त्वाचे आहे. पाच दिवस झाले पण दिल्ली-हरियाणा सीमेवरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले शेतकरी हटायला तयार नाहीत. ऐन थंडीत पाण्याचे फवारे झेलत, हरियाणा सरकारनं त्यांना अडवण्यासाठी खोदलेले रस्ते बुजवत, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलत ते इथवर पोहोचले आहे. आधी त्यांना दिल्लीत येऊच द्यायचं नाही या निर्धारात असलेलं सरकार आता चर्चेच्या तयारीपर्यंत आलेलं आहे. पण शेतकरी म्हणतायत आता चर्चा होणार तर ती इथेच, हायवेवरच.

यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी ट्विट करून चलो दिल्ली.. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यासोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार,असा इशारा दिला आहे.

COMMENTS