आरएसएसचे स्वामिनाथन गुरुमुर्ती, सतीश मराठेंची आरबीआयच्या संचालकपदी नियुक्ती !

आरएसएसचे स्वामिनाथन गुरुमुर्ती, सतीश मराठेंची आरबीआयच्या संचालकपदी नियुक्ती !

नवी दिल्ली – स्वदेशी जागरण मंचाचे सह संयोजक स्वामीनाथन गुरूमुर्ती आणि सतीश काशिनाथ मराठे  यांची भारतीय रिजर्व बॅंकेच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना नॉन आफीशियल आणि पार्ट टाईम डायरेक्टर म्हणून नियुक्त केले आहे. या दोघांनाही ४ वर्षांचा कालावधी मिळणार आहे. या दोघांचीही नियुक्ती आरबीआय ॲक्ट १९३४ च्या अनुच्छेद ८(१)(सी) नुसार करण्यात आली आहे.

दरम्यान स्वामीनाथन गुरूमुर्ती आणि सतीश काशिनाथ मराठे यांची भारतीय रिजर्व बॅंकेच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आल्यामुळे संघातील स्वयंसेवकांना सरकारमध्ये विविध पदांवर संधी दिली जात असल्याचं दिसत आहे. यापूर्वीही संघ प्रचारक राकेश सिन्हा यांना राज्यसभा सदस्य बनवले आहे.

COMMENTS