‘त्या’ नगरसेवकांच्या मताला किंमत राहणार का ?

‘त्या’ नगरसेवकांच्या मताला किंमत राहणार का ?

बीड – नगरविकास विभागाने अपात्र ठरवलेल्या परंतु विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या बीडच्या दहा नगरसेवकांचे मतदान स्वतंत्र लिफाफ्यात ठेवण्यात आले आहे. परिषदेच्या निवडणूक मतमोजणी वेळी दोन्ही उमेदवारांमधील अंतर 10 मतापेक्षा कमी असेल तरच या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. अन्यथा ही मतं मोजली जाणार नाहीत, त्यामुळे या नगरसेवकांच्या मताला किंमत राहणार की नाही हे मतमोजणीच्या वेळीच स्पष्ट होणार आहे.

बीड शहरातील स्वच्छतेवरुन काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या कक्षात आणि टेबल-खुर्चीवर कचरा टाकून पदाचा अवमान केला होता. या प्रकरणी काकू-नाना आघाडीच्या 11 नगरसेवकांना अपात्र करण्यात आलं. त्यामुळे या नगरसेवकांना आता नगर परिषदेच्या काऊन्सिलमध्येही बसता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपात्र नगरसेवकांना मतदानाचा हक्क बजावता येऊ नये, अशी मागणी भाजप उमेदवार सुरेश धस यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला होता. त्यानंतर या नगरसेवकांनी मतदान केलं आहे. परंतु त्यांची मतं स्वतंत्र लिफाफ्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या या मतांना किंमत मिळणार का नाही याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS