मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी  दिवाकर रावतेंची मोठी घोषणा !

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी दिवाकर रावतेंची मोठी घोषणा !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलनादरम्यान अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये ४२ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे या लोकांच्या कुटुंबातील एका सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय दिवाकर रावते यांनी घेतला आहे.

दरम्यान आरक्षणासाठी आपला जीव दिल्याबद्दल कुटुंबियांना १५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. आर्थिक मदतीबाबतचा निर्णय अद्याप देण्यात आला नसून कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी मान्य झाली आहे.त्यामुळे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

 

 

COMMENTS