ब्रेकिंग न्यूज – डीजे, डॉल्बीबाबत हाय कोर्टाचा मोठा निर्णय !

ब्रेकिंग न्यूज – डीजे, डॉल्बीबाबत हाय कोर्टाचा मोठा निर्णय !

मुंबई – गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजे आणि डॉल्बी वाजवण्याबाबत हाय कोर्टानं मोठा निर्णय दिला असून डीजे, डॉल्बीवरील बंदी हायकोर्टानं कायम ठेवली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. तसेच याबाबत आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार असून अंतरीम स्थगितीला हायकोर्टानं नकार दिला आहे.

दरम्यान गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉल्बी आणि डीजे वाजवणार असल्याची भूमिका अनेक गणेश मंडळांनी घेतली आहे. तसेच साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपण कोणत्याही परिस्थिती डीजे वाजवणार असल्याची भूमिका घेतली आहे. परंतु याबाबत हायकर्टानं बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान गणेशोत्सव आणि इतर मोठ्या उत्सवात डीजे आणि डॉल्बीमुळे मोठ्याप्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टानं ही बंदी कायम ठेवली आहे.

COMMENTS