टीव्हीवर लाईव्ह भाषण सुरू असताना “या” देशाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला, पहा व्हिडिओ !

टीव्हीवर लाईव्ह भाषण सुरू असताना “या” देशाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला, पहा व्हिडिओ !

राजकीय बड्या नेत्यांवर हल्ल्याच्या घटना काही नव्या नाहीत. यापूर्वी अनेक देशांच्या प्रमुखांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. व्हेनेजुएलामध्ये मात्र चक्क टीव्हीवरुन भाषण सुरू असताना त्यांच्या राष्ट्रपतींवर हल्ला झाला. सुदैवाने तो सुरक्षा दलाने हाणून पाडला. त्यामुळे त्यातून ते बचावले. व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे त्यांच्या जवानांच्या समोर भाषण देत होते. ते भाषण टीव्ही चॅनलवर लाईव्ह दाखवले जात होते. एवढ्यात त्यांची पत्नी आकाशाकडे पाहतात. आणि एकच हल्लकोळ सुरू होतो. मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच घेतलेल्या दक्षतेमुळे राष्ट्राध्यक्ष बचावले. मात्र यामध्ये त्यांचे 7 जवान जखमी झाले आहेत. हल्ला कोणी केले हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तिथल्या एका न्यूज चॅनलने हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

COMMENTS