पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही – मुख्यमंत्री

पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई – मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प केला आहे. सध्याच्या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळचं पाहिला आहे मात्र, आता पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा दुष्काळ संपवण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करु. त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.

तसेच राज्यात जलयुक्त शिवारची कामं झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्तमुळे विहिरींना पाणी राहिलं त्यामुळे ग्रामीण भागात टँकरवीना बराच काळ पाणी पुरु शकलं. शेतीची उत्पादकताही वाढली. कमी पावसातही मोठं नुकसान झालं नाही, हे जलयुक्त शिवारचं यश असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.औरंगाबादमधील दुष्काळाची आणि गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ११ प्रमुख धरणांची एक ग्रीड आम्ही तयार करतोय त्यांना पाईपने जोडण्याची योजना आहे. पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. याचे दोन महिन्यांत टेंडरही काढण्यात येईल. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी आपण आणू शकतो त्यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS