राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

मुंबई – राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारला दुष्काळ निवारणाच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. हा जनहिताचा मुद्दा असल्याने आपल्याला या प्रस्तावावर आक्षेप नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून आदर्श अचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. त्यानंतर  दुष्काळ निवारणाच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.

दरम्यान मतमोजणीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्र्यांनी आपल्यासोबत दौऱ्यावर नेऊ नये असे आयोगाने निर्देश दिले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी, तहसिलदार हे निवडणूक मतमोजणीच्या कामात असतात त्यामुळे दौर्‍यावर जाऊ शकत नाहीत.

तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतात, तर उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करत असतात. हे सगळेच मतमोजणीच्या कामात असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंत्र्यांबरोबर दुष्काळी दौर्‍यावर जाऊ शकणार नाहीत.

COMMENTS