संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटिस

संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटिस

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना शुक्रवारी भोसरी जमिनी खरेदी प्रकरणी ईडीने नोटीस पाठविल्यानंतर रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावली आहबे. यामध्ये त्यांना मंगळावारी २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.

मागील महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीने चौकशी केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांना हजर राहण्याचे नोटीस पाठल्यानंतर भाजप सरकारी यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते विशेषतः संजय राऊत यांच्याकडून केला जात होता. त्यांमुळे त्यांच्या पत्नीला ईडीने कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. याप्रकरणी अद्याप संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

COMMENTS