ईडीने या आमदाराची मालमत्ता जप्त केली जप्त

ईडीने या आमदाराची मालमत्ता जप्त केली जप्त

परभणी : शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली. विशेष म्हणजे ते निवडणूनही आले. एक वर्षानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर आता ईडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर ३४६ दिवसानंतर जामीन मंजूर केला होता.

दरम्यान या प्रकरणी  ईडी कडे तक्रार केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचलल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड इतर कंपन्यांमध्ये लावली ज्यांच्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत ईडीकडून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड 247 कोटी किमतींची यंत्र त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

 

COMMENTS