“मी एकनाथ खडसेंना 30 वर्षांपासून ओळखतो, ते भाजप सोडणार नाहीत !”

“मी एकनाथ खडसेंना 30 वर्षांपासून ओळखतो, ते भाजप सोडणार नाहीत !”

अहमदनगर – नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. राष्ट्रवादी आणि अजितदादांशी जवळीकता पाहून ते राष्ट्रवादीतही जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु एकनाथ खडसेंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो ते भाजप सोडणार नाहीत असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. नवीन वर्षानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असता मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील पक्षवाढीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. खडसे 30 वर्षांपासून माझे परिचित आहेत. ते पक्ष सोडतील हे या जन्मात तरी माझ्या मनात येणार नाही तसेच मी भाजप पक्ष सोडू शकत नाही हेच खडसेंनी अजित पवारांच्या कानात सांगितले असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे. नववर्षानिमित्त त्यांनी सहकुटुंब शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

COMMENTS