एकनाथ खडसेंचं निश्चित, ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

एकनाथ खडसेंचं निश्चित, ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. खडसे हे दोन दिवस राज्याबाहेर असून राज्यात परत आल्यानंतर 20 डिसेंबरपर्यंत ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ खडसे हे दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे शिवसेनेत जाणार की “राष्ट्रवादी’त जाणार याबाबत चर्चा सुरू होती. परंतु त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच परळी येथील गोपीनाथगडावर पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. माझा भरवसा धरू नका, मी केव्हाही पक्षांतर करू शकतो’, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर अखेर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसे यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS