…पण माझा भरवसा नाही, एकनाथ खडसेंनी दिले पक्ष सोडण्याचे संकेत !

…पण माझा भरवसा नाही, एकनाथ खडसेंनी दिले पक्ष सोडण्याचे संकेत !

परळी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. पंकज मुंडेंचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.जुन्या नेत्यांनी पक्ष सोडून जावे, अशी नीती अवलंबली जात आहे. माझ्या समंतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते. आधी माझं तिकीट कापलं गेलं. जास्त बोललं तर शिस्तभंग होईल, अशी धमकी देण्यात आली असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दु:ख आहे. पंकजाला बोलता येत नाहीय ती वेदना सहन करतेय, असेही खडसे यावेळी म्हणाले.

भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज पंकजा मुंजे यांनी परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या ‘खास’ मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

COMMENTS