लवकरच नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार – एकनाथ खडसे

लवकरच नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार – एकनाथ खडसे

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही काम करत होतो. महाराष्ट्रात सरकार यावं आणि आपलं सरकार यावं. यासाठी गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी व मी आम्ही सामूहिक प्रयत्न केले. परंतु माझ्यावर दाऊद विषयी नाहक आरोप करण्यात आले. हॅकर भंगाळेला रात्री दीड वाजता देवेंद्र फडणवीस का भेटले?, माझ्याविरोधात षडयंत्र कोणी केले कोणी फोन केले माझ्याकडे सर्व पुरावे आले आहेत. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी एका मंत्र्याच्या पीएचे निकेट फोटोग्राफ हे सर्व वरिष्ठांना दाखवले आहेत. कुठल्या मंत्र्याचे काय उद्योग आहेत हे मी वरिष्ठांना कळवले आहे. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. माझ्या मुलीला विधानसभेत पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला तेही मी वरिष्ठांना पुरावे दिले आहेत मात्र यावरही कुठलीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री पदाला कोणी आडवा येऊ नये यासाठी मला बाजूला करण्याचे उद्योग केलेले आहेत. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच मला जे पाऊल उचलायचे आहे मी ते उचलणार आहे माझे चाहते मला आजही सांगतात की तुम्ही पुढील पाऊल उचला. कोरोनाचे वातावरण शांत झाल्यावर निश्चितच मी पाऊल उचलणार आहे. महाराष्ट्रात माझ्या चाहात्यांच्या मनात जे आहे ते मी निश्चित करणार
आहे.

महाराष्ट्रात या व्यक्तीमुळे सरकार आलं नाही. बाहेरच्या लोकांना याचं त्याचं तिकीट काटा यामध्ये मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार हा अहंपणा होता. त्यामुळे लोकांना ही भूमिका आवडली नाही. आम्ही येणार असं म्हटलं असतं तर निश्चित सरकार येऊ शकलं असतं. त्यामुळे वरिष्ठांना भेटून सर्व सांगणार आहे. एक वेळा वरिष्ठांकडे जाऊन प्रयत्न करणार व हा माझा शेवटचा प्रयत्न असेल व त्यानंतर मी निर्णय घेईल. सर्व पुराव्यानिशी लवकरच नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. तसेच या पुस्तकात मी अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे.

देवेंद्रजी अजित पवारांवर टीका करू शकत नाही. तत्व विसरून अजित दादांसोबत संसार केला आहे. तीन-चार दिवस आम्ही दुसऱ्याच्या घरात राहिल्यानंतर कसं काय पतिव्रता राहू शकतो. त्यामुळे नैतिकता घालवल्या गेली असल्याची जोरदार टीकाही खडसे यांनी केली आहे.

COMMENTS