…तर शेतक-यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही – एकनाथ खडसे

…तर शेतक-यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही – एकनाथ खडसे

मुंबई –  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. शेत-यांच्या प्रलंबीत वीज जोडणींबाबत एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सरकारला सवाल केला आहे. वर्ष 2010-11 पासून अनेक शेतक-यांनी वीज दिली गेली नाही. त्यामुळे अनेक वीज जोडण्या प्रलंबित आहेत उत्तर महाराष्ट्रात 51 हजार, तर जळगावात असे 17 हजार शेतकरी आहेत त्यामुळे या शेतक-यांना वीज जोडून कधी देणार असा सवाल खडसे यांनी केला आहे.

दरम्यान गेली आठ वर्षांपासून शेतक-यांना वीज जोडणी दिली जात नाही, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकारनं जर या शेतक-यांकडे लक्ष दिलं नाही तर या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नांवर एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS