राष्ट्रवादीने ‘या’ पदाची ऑफर दिली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट !

राष्ट्रवादीने ‘या’ पदाची ऑफर दिली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट !

जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीनं आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला आहे. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटण्यासारखं असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादीनं मुक्ताईनगर येथे आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावत, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. यावरुनही खडसे यांनी वक्तव्य केलं आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो यावरुन मुक्ताई नगरमध्ये  राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे लक्षात येतं असं खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS