एकनाथ खडसेंची आक्रमक भूमिका, उपोषणाला बसण्याचा सरकारला इशारा !

एकनाथ खडसेंची आक्रमक भूमिका, उपोषणाला बसण्याचा सरकारला इशारा !

जळगाव – एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुढील आठ दिवसात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नावर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगाव इथल्या रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून एकही डॉक्टर नाही. शासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करून ही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने खडसे आक्रमक भूमिका घेतली आहे.

जळगावमध्ये गेली अनेक दिवसांपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवा वा-यावर आहे. याबाबत अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. तरी सरकारकडून आतापर्यंत दुर्लक्ष केल्यामुळे आपण ही भूमिका घेतली असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसचे याठिकाणी 8 दिवसात जर डॉक्टर उपलब्ध झाले नाही, तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आरोग्य संचालकांना देखील पत्र पाठवलं आहे.

COMMENTS