एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची कॉपी महापॉलिटिक्सच्या हाती, पाहा काय म्हणालेत राजीनाम्यात?

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची कॉपी महापॉलिटिक्सच्या हाती, पाहा काय म्हणालेत राजीनाम्यात?

मंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी जयंत पाटील यांनी गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं. शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असंही जयंत पाटील म्हणाले. तसेच एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

खडसे यांच्या राजीनाम्याची कॉपी महापॉलिटिक्सच्या हाती लागली आहे. काय म्हणालेत राजीनाम्यात ते पाहा.


दरम्यान आपल्या राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS