राष्ट्रवादी नाही तर एकनाथ खडसे जाणार ‘या’ पक्षात?, थेट ऑफरमुळे  संभ्रमात!

राष्ट्रवादी नाही तर एकनाथ खडसे जाणार ‘या’ पक्षात?, थेट ऑफरमुळे संभ्रमात!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच पक्षाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे. गेली काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु अशातच खडसे यांना आणखी एका पक्षानं थेट ऑफर दिली आहे. शिवसेना नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांनी एकेकाळी खूप कष्ट केले आहेत. त्यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चा होत आहेत. ते जर दुसरा विचार करत असतील तर मला वाटतं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करावं असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान येत्या 10 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधणार असल्याची चर्चा आहो. परंतु ज्या व्यक्तीने महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जिवाचे रान केलं त्या व्यक्तीवर पक्ष सोडण्याची अशी वेळ येणं हे दुर्दैवी आहे. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचा किंवा त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र त्यांनी शिवसेनेत काम करावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे असं सामंत म्हटलं आहे. त्यामुळे सामंत यांच्या या ऑफरमुळे एकनाथ खडसे पुन्हा संभ्रमात पडले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS