खूप प्रेम करणारी माणसं असल्यामुळेच प्रसिद्धी मिळत आहे – एकनाथ खडसे

खूप प्रेम करणारी माणसं असल्यामुळेच प्रसिद्धी मिळत आहे – एकनाथ खडसे

धुळे  माध्यम आणि अन्य ठिकाणी आपल्यावर प्रेम करणारी काही माणसं असल्याने खूप प्रसिध्दी मिळत असल्याचा उपरोधीक टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. धुळ्यात माध्यमांशी बोलतांना खडसे यांनी हा टोला लगावला आहे. नाशिक एसीबी कार्यालयात आपण कर्ज घेऊन घेतलेल्या गाडीची कागदपत्र द्यायला गेलो होतो, असं स्पष्टीकरणही खडसे यांनी दिलं आहे.तसेच माझ्या बाजूने एसीबीची चौकशी पूर्ण झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं असून भाजप माझ्यासोबत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कर्जाने घेतलेल्या गाडीची कागदपत्र देण्यासाठी नाशिक एसीबी कार्यालयात गेलो होतो. तसेच फक्त नाशिक एसीबीची चौकशी बाकी असून अन्य चौकशीमंध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी खडसे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता सावध भूमिका घेत त्यांनी बोलणं टाळलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS