गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी खूशखबर !

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी खूशखबर !

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी राज्य शासनानं खुशखबर दिली आहे. 10 ते 13 सप्टेंबर या कालावधीत टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणा-या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान या टोलमाफीसाठी विशेष पास देण्यात येणार असून परतीच्या प्रवासातही हा पास वापरता येणार आहे.  मुंबई – गोवा आणि मुंबई – कोल्हापूर मार्गावर ही टोलमाफी दिली जाणार आहे. तसेच हा टोलमाफीचा पास पोलीस आरटीओ कार्यालयात 8 सप्टेंबरपासून मिळणार असून रस्त्यावरील सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या असून मुंबई – गोवा महामार्गावर क्रेन आणि अ‍ॅम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मुंबई – गोवा मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार असून पाली-वाकण-खोपोली मार्गावरही विशेष व्यवस्था आली असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.

 

COMMENTS