राष्ट्रवादीला धक्का, निवडणूक आयोगानं पाठवली ‘ही’ नोटीस !

राष्ट्रवादीला धक्का, निवडणूक आयोगानं पाठवली ‘ही’ नोटीस !

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण निवडणूक आयोगानं पक्षाला नोटीस पाठली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस आयोगानं दिलीय. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो असं बोललं जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. राज्यात या दोनही पक्षांच्या फक्त 5 जागा मिळाल्या आहेत. यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे. या खराब कागिरीनंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे.आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो.

COMMENTS