राज ठाकरेंना द्यावा लागणार सभांचा खर्च, निवडणूक आयोगाचे आदेश !

राज ठाकरेंना द्यावा लागणार सभांचा खर्च, निवडणूक आयोगाचे आदेश !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभांचा खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवणार हे पैहणं गरजेचं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या प्रचारसभांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. प्रत्येक सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधाला होता. तसेच भाजपला मतदान करु नका असं आवाहनही केलं होतं.

त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभांबाबत भाजपने निवडणूक आयोगाला  पत्र लिहिले होते. राज ठाकरे निवडणूक लढत नसताना कुणासाठी प्रचारसभा घेत आहेत? या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? अशी विचारणा भाजपने पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली होती. भाजपच्या या पत्राची दखल घेत निवडणूक आयोगाने राज ठाकरेंच्या सभाच्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंना आता सभांचा खर्च निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS