राज्यातील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणूक आणि मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल !

राज्यातील ‘या’ नगरपरिषदांच्या निवडणूक आणि मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल !

मुंबई – राज्यातील काही नगरपरिषदांसाठी घेण्यात येणा-या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती असून वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनीत 16 ऐवजी 20 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. तसेच  नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

दरम्यान 15 जुलै 2018 रोजी मतदान होणाऱ्या पुण्यातील वडगाव नगरपरिषद, जळगावमधील मुक्ताईनगर नगरपरिषद, अकोल्यातील बार्शीटाकळी नगरपरिषद आणि नागपुरातील पारशिवनी या नगरपरिषदेसाठी वानाडोंगरीसोबतच 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

 

COMMENTS