राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान, राज्यातील ‘हे’ 6 खासदार होणार निवृत्त !

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान, राज्यातील ‘हे’ 6 खासदार होणार निवृत्त !

नवी दिल्ली – राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबत निवडणूक आयोगानं शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेतील 58 खासदार 2 एप्रिलरोजी निवृत्त होणार असल्यामुळे त्याठिकाणी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. यापैकी महाराष्ट्रातील एकूण 6 खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वंदना चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डी पी त्रिपाठी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रजणी पाटील – काँग्रेस, अनिल देसाई – शिवसेना, राजीव शुक्ला – काँग्रेस आणि अजयकुमार संचेती – भाजप, हे सर्व खासदार 2 एप्रिलरोजी निवृत्त होणार आहेत.

दरम्यान आंध्र प्रदेशातील 3, बिहारमधील, 6, छत्तीसगढ -1, गुजरात – 4, हरियाणा – 1, हिमाचल प्रदेश -1, कर्नाटका -4, मध्य प्रदेश – 5, तेलंगमा -3, उत्तर प्रदेश – 10, उत्तराखंड – 1, पश्चिम बंगाल -5, ओडिसा – 3, राजस्थान -3  आणि झारखंडमधील – 2 खासदार निवृत्त होणार आहेत.

तसेच 12 मार्चपर्यंत उमेदवारीचा अर्ज दाखल करता येणार असून 23 मार्च रोजी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दिनांक 23 मार्चरोजी पाच वाजता लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

COMMENTS