‘त्या’ वादग्रस्त आठ मतदारांचा चेंडू निवडणूक आयुक्तांच्या दालनात !

‘त्या’ वादग्रस्त आठ मतदारांचा चेंडू निवडणूक आयुक्तांच्या दालनात !

उस्मानाबाद – उस्मानबाद-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघातील 1005 पैकी आठ मतदारांच्या मतदानांचा फैसला आयुक्तांच्या दालनात गेला आहे. बीड जिल्ह्यातील हे आठ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी सहा सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केले होतं. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते. तर केज नगरपंचायत आणि शिरूर नगरपंचायतीमधील दोन सदस्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी  अपात्र ठरविले आहे.

दरम्यान त्यामुळे या आठही सदस्यांनी 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करता येईल की नाही, याबाबत उस्मानाबाद जिल्हा निवडणूक विभागाने राज्याचे निवडणूक आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे. त्यानंतर त्यांचा फैसला आता निवडणूक आयुक्तांकडे गेला असून या मतदारांबाबत निवडणूक आयुक्त काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS