विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेकडे,विजय औटी बिनविरोध !

विधानसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेकडे,विजय औटी बिनविरोध !

मुंबई – विधानसभेचं उपाध्यक्षपद अखेर शिवसेनेकडे गेलं आहे. दोन आमदारांनी उपाध्यक्षपादासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे हे पद आता शिवसेनेकडे गेलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु या दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

दरम्यान शिवसेना-भाजप आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे विजय औटी यांचा विजय अगोदरच निश्चित मानला जात होता. त्यामुळे या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला होता. विधानसभेत विरोधकांच्या तुलनेत भाजपचे 123 आणि शिवसेनेचे 63 आमदारांचे संख्याबळ आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप बजावण्यात आला होता.

 

COMMENTS