अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ नेते आणि बंडखोरांनी भरला उमेदवारी अर्ज!

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ‘या’ नेते आणि बंडखोरांनी भरला उमेदवारी अर्ज!

मुंबई – आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख होती. त्यामुळे राज्यभरातील अनेक नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काल ज्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्याच्या आढावा आम्ही घेतला होता. त्याचबरोबर आजही काही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज (शुक्रवार) मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नागपूर विधानसभा मतदारसंघ

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रॅली काढली होती. त्यानंतर पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अहमदनगर शिर्डी विधानसभा मतदारसंघ

अहमदनगरमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरेश थोरात हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सुरेश थोरात हे जोरवे गावचे रहिवाशी असून बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक राजकारणात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

शिर्डी मतदारसंघ

राज्याचे गूहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमधून आपला उमेदवारी अर्ज राहाता तहसील कार्यालयात जावुन दाखल केला आहे. विखे यांच्याबरोबर एकेकाळी विखेंचे कट्टर विरोधक राहीलेले राजेद्र पिपाडा देखील उपस्थीत होते.

श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ

श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गुहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थीत होते. कांबळेंनी लोकसभा निवडणुक काँग्रेसकडुन लढवली होती त्यानंतर विखेंची कांबळे विरोधात भुमिका होती मात्र आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कांबळेंना शिवसेनेच तिकीट मिळाल्याने युती धर्म म्हणुन विखेंनी आज कांबळेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थीती दाखवत नाराजींच्या चर्चेना विराम दिलाय.

अहमदनगर

कर्जत जामखेड मतदारसंघात
भाजपकडून राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे यंसोबत गिरीष महाजन आमदार मोनिका राजळे भीमराव धोंडे यांच्यासोबत मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिर्डी मतदारसंघ

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे साहेबराव नवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाळासाहेब थोरातांविरोधात शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली आहे.

भाजप, शिवसेना बंडखोर उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल!

कल्याण पश्चिम विधानसभामधून भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर कल्याण पूर्व विधानसभामधून शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनीही भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आहे.

बुलढाणा मतदारसंघ

शिवसेनेने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार विजयराज शिंदेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश प्रवेश घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गोंदिया मतदारसंघ

माजी सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज आज दाखल केला असून भाजपकडून त्यांना उमेदवारीकरिता तिसऱ्यांदा तिकीट दिलेले आहे , गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पंढरपूर मतदारसंघ

भारत भालके यांनी आज पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अकोला मतदारसंघ

काँग्रेसला धक्का बसला काँग्रेसचे निष्ठावान माजी महापौर मदन भरगड यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. निष्ठावान असलेल्या मदन भरगड यांना उमेदवारी न दिल्याने VBA मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे. तर वंचित ने मदन भरगड यांना अकोला पश्चिम मधून उमेदवारी दिली आहे. अकोला पश्चिममधून वंचितने आधी इम्रान पुंजनीचा नाव जाहीर केलं होतं.

नाशिक

राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्व मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपनं केलेल्या सर्व्हेत माझा चांगला जनसंपर्क आणि काम असल्यानं मला उमेदवारी दिली. मोठ्या मताधिक्यांनी मी निवडून येईल अशी राहुल ढिकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सांगली मतदारसंघ

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन आणि रॅली आणि मेळावा घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम उपस्थित होते..

सांगली मतदारसंघ

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदरसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या समवेत विशाल पाटील , जयश्री पाटील , राष्ट्रवादीचे संजय बजाज , कमलाकर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे उपस्थित होते.

येवला मतदारसंघ

छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

बीड मतदारसंघ

बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, काका जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप अशी लढाई होणार आहे .

अकोला बाळापूर विधानसभा मतदारसंघ

बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघ

बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सानप हे नाशिक पूर्वचे भाजप आमदार होते. भाजपने डच्चू दिल्यानंतर सानप राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

नाशिक मध्य मतदारसंघ

काँग्रेसने नाशिक मध्यची जागा बदलली असून शाहू खैरे यांच्याऐवजी हेमलता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवयानी फरांदे आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

चंद्रपूर मतदारसंघ

काँग्रेसने ऐनवेळी चंद्रपूर विधानसभेचे तिकीट बदलले आहे. महेश मेंढे यांच्याऐवजी आता किशोर जोरगेवार यांना संधी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत तृतीय स्थानी राहिलेल्या मेंढे यांनाच पुन्हा तिकीट दिले होते.
परंतु आता जोरगेवार यांना तिकीट दिले आहे.

सिंधुदुर्ग मतदारसंघ

सतीश सावंत यांना भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना-भाजपात मैत्रिपूर्ण लढत होणार आहे.

नवी मुंबई ऐरोली मतदारसंघ

ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.

सोलापूर शहर मतदारसंघ

शिवसेनेचे बंडखोर महेश कोठे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनीअक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील व रासपचे सुनील बंडगर आदी उपस्थित होते.

पंढरपूर मतदारसंघ

महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हिंगोली वसमत मतदारसंघ

भाजपचे ऍड्. शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करत वसमत मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन किमी अंतरावरून रॅली काढून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. लोकसभेवेळी वरिष्ठांकडून शब्द मिळाल्याने त्यांनी माघार घेतली होती. शिवसेनेला तिकीट मिळाल्याने जाधव नाराज होते. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

मोहोळ विधानसभा मतदासंघ

लोकशाहीर अण्णासाहेब साठे प्रकरण जमिनीवर सुटून आलेले आमदार रमेश कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदासंघातुन आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आहे.

COMMENTS