मुख्यमंत्र्यांच्या मनगटात ताकद नाही

मुख्यमंत्र्यांच्या मनगटात ताकद नाही

नागपूर : पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं सांगण्याची ताकद या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं नाही. त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली आहे.

बावनकुळे म्हणाल, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनगटात ताकद होती. पाच वर्षे शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं होतं. पण या मुख्यमंत्र्यांच्या मनगटात तसं सांगण्याची ताकद नाही. त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली आहे.

दरम्यान, बावनकुळेंच्या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे. त्यात कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारवर ओझं पडलं आहे. त्यामुळे दुर्देवाने वीजबिल थकबाकी वसूल करण्याशिवाय काहीही शिल्लक राहिलेलं नाही, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS