धुळ्यात भाजप मंत्र्यांच्या सभेसाठी वीज चोरी !

धुळ्यात भाजप मंत्र्यांच्या सभेसाठी वीज चोरी !

धुळे – भाजप मंत्र्यांच्या सभेसाठी धुळ्यामध्ये चक्क वीज चोरी केली असल्याचं समोर आलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीर सभेमध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीत वीज चोरी करण्यात आली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रभाग क्रमांक एकमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडला आहे. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे ह देखील उपस्थित होते.

दरम्यान मंत्र्यांच्या या जाहीर सभेसाठी एक मोठा जनरेटर आणण्यात आला होता, मात्र मुख्य मंचावर प्रकाश टाकणारे फोकस हे वीज चोरी करून लावण्यात आले असल्याचं समोर आलं आहे. सभा सुरू असलेल्या इमारतीच्या वरून जाणाऱ्या वीजेच्या तारांवर आकडे टाकून त्यासाठी वीज घेण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या या मंत्र्यांवर राज्यभरातून जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS