आता दर महिन्याच्या 21 तारखेला शाळेत साजरा होणार ‘योग दिन’

आता दर महिन्याच्या 21 तारखेला शाळेत साजरा होणार ‘योग दिन’

मुंबई: योग साधनेच महत्व विद्यार्थ्यांना कळावा म्हणून फक्त 21 जूनच नव्हे तर दर महिन्याच्या 21तारखेला शाळेत योग दिन साजरा करावा अशी सूचना शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील क्रीडाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी विनोद तावडे यांनी सवांद साधला.
प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला किमान अर्धा तास तरी शाळेत विद्यार्थ्यांना योगचे धडे देऊन योगा हे शरीरासाठी किती उपायकारी आहे आणि महत्वाचे आहे हे समजवून सांगावे.
21 तारखेला जर सुट्टी असल्यास त्याच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस शाळेत साजरा करावा.

एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून राज्यभर होणाऱ्या योग दिनाचे फोटो त्यावर उपलब्ध करण्यात यावे. असे अहवान तावडेंनी केले.
21 जून रोजी होणारा योगदिन कशाप्रकारे साजरा करण्यात येणार आहे? कोणते नियोजन करण्यात आले आहे? याची माहिती शिक्षण आयुक्तांना 16 जून पर्यंत द्यावी.
अशी सूचनाही विनोद तावडे यांनी केली.

COMMENTS