राजस्थानमध्ये भाजपला धक्का बसणार, काँग्रेसला मिळणार सत्ता – एक्झिट पोल

राजस्थानमध्ये भाजपला धक्का बसणार, काँग्रेसला मिळणार सत्ता – एक्झिट पोल

नवी दिल्ली – राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. त्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार राजस्थानमधील मतदारांनी भाजप व काँग्रेसला आलटून-पालटून सत्ता देण्याचा प्रघात कायम राखला असल्याचं वर्तवलं जात आहे. याठिकाणी काँग्रेसला बहूमत मिळेल असं अंदाज विविध एक्झिट पोलनी वर्तवला आहे.

टाईम्स नाऊ- सीएनएक्सचा एक्झिट पोल

विधानसभेच्या २०० जागा असलेल्या राजस्थानमध्ये काँग्रेसला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळणार आहे. तर भाजपला ८५ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, बसपा २ व ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे.

राजस्थानचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहता कोणताही पक्ष सलग दोन टर्म सत्तेवर राहिलेला नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये यावेळी काँग्रेसची सत्ता येणार असा अंदाज बांधला जात होता. एक्झिट पोलची आकडेवारी पाहता हे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. या एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

 

COMMENTS