“जप्त केलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती !”

“जप्त केलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती !”

मुंबई – एटीएसनं जप्त केलेली स्फोटकं ही मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी होती असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एटीएसनं काल धाड टाकून हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत यांच्या घरातून जप्त केली आहेत. याप्रकरणी एटीएसनंनं आणखी दहा ते बारा जणांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं असून वैभव राऊत व त्याच्या दोन्ही साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले 8क्रूड बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठी होती. त्यामुळे महराष्ट्रात आराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान जप्त केलेल्या स्फोटांबाबत अधिक तपास पोलिस आणि एसटीसकडून केला जात आहे.

COMMENTS