काँग्रेसला फेसबुकचा दणका, पक्षाचे 687 पेज हटवले!

काँग्रेसला फेसबुकचा दणका, पक्षाचे 687 पेज हटवले!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला चांगलाच दणका बसला असून फेसबुक या सोशल मीडिया कंपनीने काँग्रेस पक्षाचे 687 पेज आणि त्यासंबंधीत व्यक्तिगत खातीही हटवले आहेत. देशभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर फेसबुकने ही कारवाई केली असून या पेजवरुन गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहार सुरु होते. त्याशिवाय या पेजचे अॅडमिन स्थानिक बातम्या, राजकीय मुद्दे, आगामी लोकसभा निवडणुका व त्यातील उमेदवारांचे विचार शेअर करत असल्याने हे पेज बंद करण्यात आले असल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक, ट्विटर, युट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सोशल मीडिया पेजवर राजकीय बातम्या, जाहिरात, पक्ष यावरही निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार अनेक पक्ष प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे फेसबुकच्या निदर्शनास आले. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे 687 फेसबुक पेज आणि त्यासंबंधीत व्यक्तिगत खातीही बंद केली आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत अशाप्रकारे फेसबुक पेज हटवल्याने काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे.

PAGES

1 2

COMMENTS