शिवसेना-भाजपच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट !

शिवसेना-भाजपच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट !

मुंबई  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. परंतु आगामी काळातही शिवसेना-भाजपची युती व्हावी यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. युती करणार नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं आहे. परंतु विधान परिषद निवडणुकीत मात्र शिवसेनेनं तीन-तीन जागा वाटून घेतल्या होत्या असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.विधान परिषद निवडणुकीत चर्चा करून ३-३ जागा वाटून घेतल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु हा वाद विसरुन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शिवसेनेपुढे युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पालघरमध्ये ज्या प्रकारे युतीतील दोन पक्षांमध्ये कटुता आली ती क्लेशदायक होती आणि ती टाळता आली असती तर आनंदच झाला असता. युतीतील दोन पक्षांनी अशा पद्धतीने निवडणूक लढवावी का याचे चिंतन करण्याची गरज असून आता ते सगळे संपले आहे. परंतु तरीही आमची युतीची तयारी आहे आता भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का किंवा पुन्हा निवडणुकांच्या तोंडावर भाजपसोबत हातमिळवणी करणार असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

 

COMMENTS