…मग त्यांच्यावर ही जबाबदारी का?, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल !

…मग त्यांच्यावर ही जबाबदारी का?, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल !

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या कारभारावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे. फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पत्र ट्वीट केले आहे. या पत्रात कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी काही व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. ही टीम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
 
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1267738342902435840?s=19
दरम्यान मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबद्दल अजून कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु, दोन प्रकरणासाठी ही परवानगी दिल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही संघटना देश विरोधी आणि समाज विरोधी कृत्यांसाठी ओळखली जाते, मग त्यांच्यावर ही जबाबदारी का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रकार मान्य आहे का? आणि जर हे मान्य नसल्यास या प्रकरणी कोणती कठोर कारवाई करणार असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय प्रतिक्रिया देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS