गणराज ज्यांच्या पाठिशी आहे त्यांना वर्ष मोजावी लागत नाहीत – मुख्यमंत्री VIDEO

गणराज ज्यांच्या पाठिशी आहे त्यांना वर्ष मोजावी लागत नाहीत – मुख्यमंत्री VIDEO

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक कर्मचारी उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील जनतेसाठी साकडं घातलं आहे. आज गणेश पर्वाची सुरुवात होत आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांनी राज्यातील विघ्न दूर करावीत. विशेषतः आमचा जो शेतकरी आहे तो सुखी झाला पाहिजे. जेथे पाऊस झाला नाही तेथे पाऊस पडावा. कुठल्याही भेदा शिवाय समाज संघटीत झाला पाहिजे. अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी गणरायाकडे केली आहे.

दरम्यान राज्याच्या जनतेचा आणि गणेशाचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी श्री गणेश आमच्या पाठिशी असून गणराज ज्यांच्या पाठिशी आहे त्यांना वर्ष मोजावी लागत नसल्याचा टोलाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

 

 

COMMENTS