2020 पर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल – मुख्यमंत्री

2020 पर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल – मुख्यमंत्री

नागपूर 2020 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतल्या इंदू मिलवरच्या स्मारकाचं काम सरकार पूर्ण करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर झालेल्या 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. तसेच काही लोक जाणूनबुजून अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राज्यातलं सरकार हे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज आणि महात्मा फुले यांच्यांच विचारांनी चालणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गीता, बायबल आणि कुराण पेक्षा मला मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा जास्त सन्मान असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.

 

 

COMMENTS