महाविकासआघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांची पहिली टीका, म्हणाले हे दुर्दैवी आहे!

महाविकासआघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांची पहिली टीका, म्हणाले हे दुर्दैवी आहे!

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असं ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. परंतु त्यानंतर लगेच दुसरं ट्वीट करत फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या असंही फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS