फडणवीस सरकारवर राजकीय संकट !

फडणवीस सरकारवर राजकीय संकट !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सध्या राजकीय संकटात अडकलं असल्याचं दिसत आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमुळे फडणवीस सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. हे प्रकरण शांत होईपर्यंत मराठा महासंघानंही आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन पुढील महिन्यात हे आंदोलन पेटणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांना फडणवीस सरकारविरोधात आयतं कोलीत मिळत आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी मराठा समाजानं केली आहे. त्यामुळे दलित समाजही अस्वस्थ आहे. या दोन्ही समाजाच्या मागणीमुळे फडणवीस अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान फडणवीस सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर असल्याचीही चर्चा भाजपच्या नेत्यांमध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला सोबत घेऊन विरोधकांचा सामना करणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून मराठा कार्डाचे राजकारण खेळले जात असल्याचीही भाजपच्या गटात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले जात आहेत.

COMMENTS