विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचं निधन !

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचं निधन !

मुंबई – विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांचं मंगळवारी निधन झालं आहे. अध्यापनाचे कार्य करत असतानाच फरांदे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राज्याचा चौफेर अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. विधान परिषदेचे आमदार म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विधान परिषदेचे उपसभापती आणि सभापती म्हणून काम करताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतला संवाद कायम ठेवला.

त्यांच्या निधनामुळे अभ्यासू, अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS