मुख्यमंत्र्यांना शेतक-यांनी दाखवले काळे झेंडे !

मुख्यमंत्र्यांना शेतक-यांनी दाखवले काळे झेंडे !

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नाशिकचा दौरा केला आहे. या दौ-यादरम्यान मेट्रो शेल्टर २०१७ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. परंतू   त्र्यंबकेश्वरच्या दिशेने  जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी या शेतक-यांनी केली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना ‘दलाल’ संबोधले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले असल्याची माहिती मिळत आहे. ओझर विमानतळावरुन मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफुलीवर शेतक-यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला. त्यावेळी हा ताफा आडवण्याचा प्रयत्नही काही शेतक-यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS