चक्कजाममुळे अमित शहांचा दौरा रद्द

चक्कजाममुळे अमित शहांचा दौरा रद्द

मुंबई: गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्ली सोडून संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग येथे मेडिकल काॅलेजच्या उद्धाटनासाठी येणार होता. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे हा दौरा रद्द केला आहे.

संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली वगळून उद्या देशभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांची शेतकरीच काळजी घेणार आहेत. वाहतूक कोंडीत अडकलेल्यांसाठी मोफत जेवण आणि पाणी देण्याची व्यवस्था शेतकरी करणार आहेत.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. उद्या सिंधुदुर्गात भाजप नेते नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. पण शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे उद्याचा दौरा रद्द करण्यात आला असून आता शहा रविवारी सिंधुदुर्गात येणार आहेत.

COMMENTS