शेतकर्‍यांना माल ऑनलाईन विकता येणार, राज्य सरकारची ई नाम योजना !

शेतकर्‍यांना माल ऑनलाईन विकता येणार, राज्य सरकारची ई नाम योजना !

मुंबई – शेतकर्‍यांना आता आपला माल ऑनलाइन विकता येणार आहे.  राज्य सरकारनं यासाठी ई नाम योजना विधेयक मंजूर केलं आहे. विधानसभेत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. शेतकर्‍यांना आपला माल आठवडा बाजारच्या माध्यमातून थेट ग्राहकाला विकण्याची परवानगी मिळाली. याचेच पुढचे पाऊल म्हणून शेतकर्‍याला आता आपला माल ऑनलाइन विकता येणार आहे.

दरम्यान इ-नाम योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आपला माल थेट ग्राहकाला विकता येणार असून स्वत:च्या मालाचा दरही ठरवता येणार आहे. केंद्राच्या योजनेनुसार राज्य सरकारने विधेयक आणून ही योजना राज्यात राबविण्याचा मार्ग खुला केला आहे. यासंदर्भात २५ ऑक्टोबर रोजीच राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. राज्यातील ६० कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  ही ई-नाम योजना राबविण्यात येणार आहे.

त्यामुळे ‘एपीएमसी’मधील दलालांच्या जाचातून शेतक-यांची मुक्तता होणार आहे. ऑनलाईन विक्रीमुळे शेतकर्‍यांची दलालांच्या जाचातून मुक्तता होणार आहे. शेतकर्‍याला स्वत:च्या मालाची किंमत स्वत:च ठरवता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍याला ज्या बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळेल तिथे त्या शेतमालाची विक्रीही करू शकणार आहे.

COMMENTS