… तर शरद पवारांविरोधात माढ्यातून लढणार – महादेव जानकर

… तर शरद पवारांविरोधात माढ्यातून लढणार – महादेव जानकर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स विकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपनं जर संधी दिली तर आपण शरद पवारांविरोधात माढ्यातून निवडणूक लढवू असं वक्तव्य केलं आहे. आता पूर्वीसारखी स्थिती राहिली नसल्याने शरद पवार यांचा प्रभाव कमी झाला आहे, त्यामुळे जर भाजपाने आपल्याला तिकीट दिले तर माढा लोकसभा मतदारसंघातून आपण शरद पवारांविरोधात लढू असं जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवारांना जर टक्कर द्यायची असेल तर त्यांच्याविरोधात भाजपाने आपल्याला तिकीट द्यावे अशी इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच आपल्याला महाराष्ट्र केसरी नव्हे तर हिंद केसरी व्हायचे असून आपली खासदार व्हायची इच्छा असल्याचंही यावेळी जानकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS